Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्थर न्यायालय लवकर चालू करण्याबाबत पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशनच्या वतीने   प्रधान सचिव श्रीमती सुवर्णा केवले, (विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई) यांना निवेदन देण्यात आले.

पिंपरी चिंचवड मधील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पिंपरी नेहरूनगर न्यायालयामध्ये मोठ्या प्रमाणात खटले दाखल होत आहेत .त्याचा ताण न्यायव्यवस्थेवर वर पडत आहे. परिणामी न्यायदानाच्या कामामध्ये दिरंगाई होत आहे. पुणे येथे अपिलातील खटले चालवण्याकरिता बहुसंख्य वकील वर्ग व पक्षकार यांना ट्राफिक, पार्किंग यांनसारख्या समस्याना सामोरे जावे लगत आहे.

पिंपरी येथील जुन्या न्यायालयाच्या इमारतीमध्ये चार कोर्ट रिकामे असून त्या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्याधीश वरिष्ठ स्थर व्यायालय लवकरात लवकर चालू करण्यात यावे या संदर्भात चर्चा करून प्रधान सचिव श्रीमती सुवर्णा केवले, (विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई) यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी मा.अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ, ॲड.सुनिल कडूस्कर मा.उपाध्यक्ष ॲड. प्रतिक जगताप, ॲड. पांडुरंग शिनगारे, ॲड अरुण खरात , ॲड.संगिता कुशलकर, पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशनचे अध्यक्षा ॲड.प्रमिला गाडे, उपाध्यक्ष ॲड.गोरख कुंभार, सचिव ॲड.अक्षय केदार , खजिनदार ॲड.संतोषी काळभोर सदस्य ॲड.विशाल पौळ, ॲड.तेजस चवरे, ॲड.जयेश वाघचौरे उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version