Spread the love

 

     पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –    पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना, डॉ. श्रीक्रिष्णा मुंडे यांचे श्री आरोग्य व दंत स्टुडीओ निगडी प्राधिकरण आणि आयडीएफसी फस्ट बँक यांचे संयुक्त विद्यमाने भोसरी औद्योगिक परिसरातील कामगारांसाठी जागतिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग दिनाचे औचित्य साधून मोफत आरोग्य व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

      या आरोग्य शिबिरास संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, संचालक संजय सातव, लघु उद्योजक प्रकाश ढमाले, डॉ. श्रीक्रिष्णा मुंडे, डॉ. स्नेहल दातीर, डॉ. पंकज आहाळे, डॉ. संचिता पोंडे  तसेच आयडीएफसी फस्ट बँकेचा स्टाफ उपस्थितीत होता.

       या मोफत आरोग्य व दंत तपासणी शिबिरात जवळपास १४५ कामगारांनी आपले आरोग्य तपासून घेतले. काही कामगारांना शुगर, बिपी आढळून आले तसेच दातांच्या देखील काही समस्या आढळून आल्या त्यावर डॉ.मुंडे यांनी योग्य मार्गदर्शन करून त्यावरील उपाय  देखील सांगितले. डॉ. मुंडे यांनी सर्व कामगारांना आरोग्यविषयक चांगली माहित देवून आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version