पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राइड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये. विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला, तसेच शाळेतील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यानी विज्ञान प्रदर्शनात भाग घेतला होता. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार शाळेच्या मुख्याध्यापिका नाझमीन शेख उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक अनेक मान्यवर, तसेच पालक, विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी उपस्थित होते.
सर्व विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे विज्ञान प्रकल्प उत्तम रित्या बनवून आणले होते, यामध्ये खगोलशास्त्र, हवामानशास्त्र, जैविकशास्त्र, भौतिकशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, या विषयावरती वेगवेगळे प्रयोग विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनामध्ये सादर केले होते, प्रदूषण, हृदयरक्त अभिसरण, पाणी शुद्धीकरण, कृषी पर्यटन, पीएसएलव्ही, रॉकेट, पवनचक्की, जललहरी, पीएसएलव्ही मॉडेल, अग्निशमन रोबोट, होलोग्राम. हे प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकत्तेर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रयोग सादर करत असताना उपस्थितांच वेधून घेत होते.
विज्ञान दिनानिमित्त शाळेतील शैक्षणिक सहल आयुका येथे गेली होती. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रत्यक्षिके, विज्ञानाची मनोरंजन कहाणी आणि खेळांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सी. व्ही. रमण यांच्या जयंतीनिमित्त विज्ञान दिन साजरा
Previous Articleमनपा गोवंश व मोठ्या पशुधनासाठी कोंडवाडा कधी उभारणार – कुणाल साठे
Next Article एमआयटी एडीटी विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान परिषद
