Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»निवडणूक हलक्यात घेऊ नका, सजग राहा – उपमुख्यमंत्री अजित पवार 
ताज्या घडामोडी

निवडणूक हलक्यात घेऊ नका, सजग राहा – उपमुख्यमंत्री अजित पवार 

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com10 November 2024No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love
आमदार अण्णा बनसोडे यांना विजयी करण्याचे आवाहन
पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  –  विधानसभा निवडणूक हलक्यात घेऊ नका. कोणीही गाफील राहू नका. १९९९ साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार २७० विरुद्ध २६९ असे एका खासदारामुळे पडले होते. आपल्याला प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे कोणीही गाफील राहू नका असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले.
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्वाधिक फायदा पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महिलांना झाला आहे. आ. अण्णा बनसोडे यांनी यासाठी चांगले काम केले. करोना काळात शहरातील नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी बनसोडे यांनी २५ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. तसेच इतर आरोग्यविषयक सुविधांसाठी सव्वा कोटींचा निधी दिला. बनसोडे हे सामाजिक भान जपणारे नेते आहेत, म्हणूनच त्यांना तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.
काळभोरनगर, आकुर्डी येथे महायुतीचा मेळावा पार पडला. मेळाव्यात अजित पवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, उमा खापरे,आरपीआयच्या महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर व समन्वयक योगेश बहल, माजी उपमहापौर तुषार हिंगे, प्रभाकर वाघेरे, आतिश बारणे, आरपीआय चे नेते बाळासाहेब भागवत व शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, महाराष्ट्र शासन अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, ज्ञानेश्वर कांबळे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष फजल शेख, शाम लांडे, भाजपा शहर कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी नगरसेवक राजेश पिल्ले, संदीप वाघेरे, नारायण बहिरवाडे, वैशाली काळभोर, राजू दुर्गे, उल्हास शेट्टी, माई काटे, संजय काटे, सुजाता पालांडे, काळूराम पवार, जितेंद्र ननवरे नारायण बहिरवाडे, सतीश दरेकर, राजेश वाबळे, सरिता साने, युवा नेते निलेश डोके, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, राष्ट्रवादी युवती शहराध्यक्ष वर्षा जगताप, सामाजिक न्याय महिला अध्यक्ष गंगा धेंडे, असंघटित कामगार नेते रवींद्र ओव्हाळ, युवा नेते अनुप मोरे, कष्टकरी कामगारांचे नेते बाबा कांबळे, सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष संजय अवसरमल, शेखर काटे, मायला खत्री, अक्षय माछरे, तुषार ताम्हाणे, हाजीभाई शेख, कविता खराडे, राजू लोखंडे, चंदा लोखंडे, प्रकाश सोमवंशी, बाळासाहेब वाल्हेकर, निलेश तरस, शैला पाचपुते, पल्लवी पांढरे, आशा शिंदे, सुनीता अडसूळ, मनीषा गटकळ,
युसुफ कुरेशी, अकबर मुल्ला, प्रदीप आवटे, विनोद वरखडे, आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, अण्णा बनसोडे हे सर्वसामान्य कार्यकर्ते होते. त्यांचा संपर्क चांगला आहे. त्यांना त्यांचे काम करू द्या.  बनसोडे आणि महायुती यांच्यामध्ये समन्वय राखण्याचे काम योगेश बहल, सदाशिव खाडे हे करतील. पुढील काळात विरोधक चुकीच्या गोष्टी पसरवतील अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पवार यांनी केले.
   पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे उद्योग नगरीसह या शहराची मिनी भारत म्हणून ओळख झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरावर माझे प्रेम आहे.
लक्ष्मण जगताप तसेच महेश लांडगे हे देखील माझेच कार्यकर्ते आहेत, असे म्हणत उपमुख्यमंत्री  पवार यांनी दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना उजाळा दिला. या निवडणुकीत माघार घेतलेल्या उमेदवारांचेही त्यांनी आभार मानले.
विरोधकांवर टीका करताना अजित पवार म्हणाले, विरोधकांकडून पंचसूत्रीच्या नावाखाली मोठमोठ्या घोषणा केल्या. महिलांना तीन हजार रुपये देणार असल्याचे विरोधकांकडून सांगण्यात आले. आम्ही दीड हजार रुपये देत असताना राज्याची तिजोरी खाली झाल्याचा आरोप करण्यात आला. मग आता हे तीन हजार रुपये कुठून आणणार हा प्रश्न आहे. आम्ही अशा योजना राबविताना आर्थिक नियोजन केले आहे. राज्यातील ग्राहकांना एक युनिट वीज पुरविण्यासाठी सात रुपये खर्च येतो. मात्र सोलर द्वारे निर्मित झालेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी साडेतीन रुपये खर्च येतो. शिल्लक राहिलेले पैसे शेतकऱ्यांसाठी देणार त्याचे आर्थिक नियोजन केले आहे. विरोधक लोकांना फसवण्याचे काम करत आहेत. हा त्यांचा चुनावी जुमला आहे असे पवार म्हणाले.
    भारतातील एकूण  विदेशी गुंतवणुकीत आपण प्रथम असून ५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आहे.
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मोठे प्रकल्प राज्यात गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करत आहेत. महाराष्ट्र परदेशी गुंतवणूकीत सर्वात पुढे आहे. क्रमांक एकवर आहे.
महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या एकूण जागांपैकी दहा टक्के जागा मुस्लिम, बारा टक्के जागा अनुसूचित जाती, बारा टक्के जागा अनुसूचित जमाती आणि दहा टक्के जागा महिलांना दिल्या आहेत. एकूण ४४ टक्के जागा सर्व समाज घटकांना दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांचा पुरोगामी विचार पुढे  घेऊन जात पुरोगामी महाराष्ट्र घडविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे पवार म्हणाले.
पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन टाटा धरणातून पाणी आणावे लागेल. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोड बनवला जात आहे. पीएमपीएमएल सक्षम केली जात आहे. मेट्रोचे जाळे वाढवले जाते आहे. शहरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणखी जास्त राबवावे लागतील. पिंपरी मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील जागेवर रमाई स्मारक होणार आहे. हे स्मारक नावाला साजेसे होणार आहे. पिंपरी चिंचवड शहराचा विकासाचा वेग आणखी वाढवण्यासाठी आण्णा बनसोडे यांना विजयी करा असे आवाहन अजित पवार यांनी केले.
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशहरातील प्रलंबित प्रश्नांना आमदार लांडगे यांनीच वाचा फोडली!
Next Article वाल्हेकरवाडी येथील काँग्रेस पक्ष कार्यालयमध्ये पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेस शहर अध्यक्ष कैलास कदम यांच्या राजीनाम्याची मागणी
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.