Spread the love

 

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी येथील
अमरधाम स्मशानभूमीत बसविण्यात आलेल्या नवीन
विद्युत दाहिनीचे काम पूर्ण झाले असून, ते सुरू करण्यात यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड
शहर भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे
केली आहे.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,
निगडीतील स्मशानभूमीतील जुनी विद्युत दाहिनी चिमणी नादुरुस्त झाली होती. तसेच जुनी विद्युत दाहिनी खूप गरम होत होती. त्यामुळे जुन्या विद्युत दाहिनीमध्ये मर्यादित अंत्यसंस्कार करण्यात
येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन या स्मशानभूमीत नवीन विद्युत दाहिनी बसविण्यासाठी गेल्या एक ते दीड वर्षापासून काम सुरू होते. आता हे काम पूर्ण झालेले आहे. मात्र फक्त राजकीय नेते मंडळींच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी नव्याने बसविण्यात आलेली विद्युत दाहिनी महापालिकेने सुरू
केलेली नाही. ही बाब मानवतेला धरून नाही.
अंतिम संस्कार करण्याची जागासुद्धा राजकीय नेत्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी नागरिकांसाठी खुली केली जात नसेल, तर ही मानवतेला शोभणारी बाब नाही. याची गांभीर्याने दखल घेऊन नवीन
विद्युत दाहिनी सुरू करण्यात यावी. जेणेकरून सामान्य नागरिकांना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी हेलपाटे मारावे लागणार नाहीत.

निगडी,आकुर्डी, रुपीनगर,जोतिबानगर, टॉवर लाईन,
त्रिवेणीनगर, तळवडे, चिखली,कुदळवाडी, मोशी याठिकाणांहून नागरिक अंत्यसंस्कार करण्यासाठी निगडी अमरधाम स्मशानभूमीत येत असतात.
येथील नवीन विद्युतदाहिनी सुरू करण्यात यावी, अशी मागणी यांनी केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version