Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»दहावी, बारावीनंतर पुढे काय?; अविनाश धर्माधिकारी यांचे शनिवारी पिंपरीत मार्गदर्शन
ताज्या घडामोडी

दहावी, बारावीनंतर पुढे काय?; अविनाश धर्माधिकारी यांचे शनिवारी पिंपरीत मार्गदर्शन

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com7 June 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या वतीने आयोजन

पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पिंपरीतील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारी (दि. ८) सकाळी दहा वाजता दहावी व बारावीनंतर काय? या करिअर मार्गदर्शन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये देशातील प्रख्‍यात एमपीएससी व युपीएससी स्‍पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारे व्‍याख्‍याते, चाणक्‍य मंडल परिवारचे संस्‍थापक संचालक व निवृत्त आयएएस अधिकारी अविनाश धर्माध‍िकारी हे दहावी आणि बारावी नंतरचे करिअर, व्‍यक्तिमत्‍व विकास आणि स्‍पर्धा परीक्षांवर पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करणार आहेत.

दहावी आणि बारावीचा निकाल नुकताच लागला आहे. या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांचे आयुष्याचे करिअर ठरविणारा टप्पा असतो. या परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आता विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची प्रक्रिया पार पाडत आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांना करिअरबाबत योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना पुढे आपण कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे असा मोठा गहन प्रश्न उभा राहिलेला असतो, अशा विद्यार्थ्यांना नेमके काय करायचे आहे, हे समजत नसल्याने गोंधळलेले असतात. अशात अनेक जण आपल्या मित्राने अमूक क्षेत्र निवडले म्हणून आपणही तेच करू किंवा स्वतः कोणताही विचार न करता घरचे सांगतील त्या क्षेत्राची निवड करतात. मात्र, गोंधळून किंवा इतरांचे ऐकून घेतलेल्या निर्णयांचा त्रास भविष्यात विद्यार्थ्यांना होऊ शकतो. असे होऊ नये म्हणून करिअरच्या संधीबद्दल तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून तंत्रशुद्ध मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना अधिक लाभ होईल. योग्य माहितीच्या आधाराने जाणीवपूर्वक निवडलेले करिअर केवळ विद्यार्थ्यांची बौद्धिक, नैतिक क्षमता वाढवत नाही, तर देशाची सामाजिक व आर्थिक बाजूदेखील बळकट करत असते.

दहावी आणि बारावी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यावरच आपल्या आयुष्याला एक दिशा मिळते. पुढील आयुष्याचे यश-अपयश, स्ट्रगल, व्यक्तीचे समाजातील स्थान हे पुढील प्रवेशावर अवलंबून असते आणि याकरिताच पिंपरी-चिंचवडमधील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांच्या पालकांना करिअरबाबत योग्य मार्गदर्शन व्हावे यासाठी चाणक्‍य मंडल परिवारचे संस्‍थापक संचालक व निवृत्त आयएएस अधिकारी अविनाश धर्माध‍िकारी यांचे करिअर मार्गदर्शन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सांगितले. अविनाश धर्माधिकारी हे विद्यार्थी व पालकांना सर्वात सामान्य करिअर ते अत्यंत दुर्मिळ करिअरची माहिती देतील. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना योग्यतेनुसार पुढील करिअर निवडण्यास मदत होईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असेल. या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवडमधील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शंकर जगताप यांनी केले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपारदर्शी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवा – भाऊसाहेब भोईर
Next Article अति धोकादायक झाडांच्या तक्रारीचा आता ‘२४ तासांत’ निपटारा!
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.