Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणातून लाडकी बहीण योजना आणि अजित पवारांचं गुलाबी जॅकेट यावरुन महायुती सरकारवर टीका केली. 1500 रुपयांमध्ये बहुमूल्य मत विकू नका. आता लाडका दादा योजना आणलीये. युवकांना स्टाय पेंड दिले जाणार आहेत. मात्र, ही योजना फक्त सहा महिन्यांसाठी लागू आहे. मग त्यापुढं काय? त्यामुळं स्टायफंड पेक्षा पर्मनंट नोकरी बद्दल युवकांनी विचार करायला हवा, असे कोल्हेंनी म्हटलं होतं. तसेच, काहींनी पिंक कलरला पसंती दिलीय, असे म्हणत जयपूरचा दाखलाही त्यांनी दिला होता. आता, या टीकेला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रत्त्यु्त्तर दिलंय. घराच्या समोरील रस्ता बनवू न शकणाऱ्यांनी अजित दादांवर बोलू नये. त्यामुळं गुलाबी स्वप्नांवर ही शब्द न काढलेले बरे. तुमची लोकसभेची सूज विधानसभेत उतरवू, अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी अमोल कोल्हेंवर पलटवार केला.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आज पिंपरीत झाला त्यावेळी त्या बोलत होत्या., त्यांनी  कोल्हेंवर बोचरी टीका केली. तर, अजित पवारांनीही गुलाबी रंगावर भाष्य केलं.

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात डीपीडीसीची बैठक पार पडली. या बैठकीत स्वत: खासदार शरद पवार यांनी उपस्थिती दर्शवली होती, त्यामुळे या बैठकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागल्याचं दिसून आलं.

Share.
Leave A Reply

Exit mobile version