Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तळवडे गावठाणा मध्ये वारंवार वीजेची समस्या निर्माण होत होती. नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले होते. त्यामुळे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी 300 के.वी. ची 240 मीटर केबल, ४.५ ते ५ लाख रुपये किमतीची केबल उपलब्ध करून देऊन तळवडे येथील नागरिकांना विजेचे समस्येपासून वंचित केले. याप्रसंगी महेश दादा यांचे बंधू कार्तिक लांडगे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून केबल टाकण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला.याप्रसंगी तळवडे ग्रामस्थांनी तसेच भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार महेश लांडगे यांचे आभार व्यक्त केले.

याप्रसंगी भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांचे बंधू कार्तिक लांडगे,मा. नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर, स्वी.नगरसेवक पांडुरंग भालेकर, सामाजिक कार्यकर्ते अनिल भालेकर, संदीप जाधव, शिरीष उत्तेकर, दादासाहेब सातपुते, रविराज सेतसंधी, शरद भालेकर, चेतन घुले, कैलास चव्हाण, कैलास भालेकर, सागर चव्हाण, बबन चव्हाण, निलेश चव्हाण, शिवाजी कुडपणे, महेश कुडपणे, संपत बाठे, गणेश भालेकर, दत्तात्रय भालेकर, देवराम चव्हाण, रमेश बाठे, अजय रासकर, आबा लांडगे, सुरज गडसिंग, मुकेश लोंढे, भाजपाचे कोषाध्यक्ष अस्मिता भालेकर, प्रमिला कुडपणे, संगीता भालेकर, लक्ष्मी चव्हाण इत्यादी मान्यवर महिला भगिनी व मान्यवर मंडळी व तळवडे ग्रामस्थ उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version