Spread the love

 

अहमदनगर ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  सर्वदूर भारत देशात श्रद्धालुंच्या कणाकणात सामावलेले “आनंदबाबा “ म्हणजेच राष्ट्रसंत आचार्य सम्राट पूज्य श्री आनंदऋषीजी म. या भव्य – दिव्य ऊर्जा शक्तीचा सहवास दीर्घकाळ मिळण्याचे सौभाग्य प्राप्त झाले असे आचार्य भगवंतांचे ज्येष्ठ सुशिष्य महाश्रमण महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य श्री कुंदन ऋषीजी म. साब.
आचार्य भगवंतांची दीक्षाभूमी असलेले मिरी गाव हे प्रवर्तकश्री जीं चे जन्मगाव, म्हणजेच जन्मतःच आनंद गुरु बरोबर नाळ जोडली गेली होती. पिता श्री चंदनमलजी मेहेर व माता केसरीबाई च्या रत्न कुक्षीत जन्म घेतलेल्या मनसुखने तनाच्या स्वास्थप्राप्तीसाठी आचार्य भगवंतांची शरण स्वीकारली आणि भर यौवनात तत्क्षणी मन परिवर्तन होऊन आत्म सुखाचा संयम मार्ग पत्करला. जैन भागवती दीक्षा ग्रहण करून संयम मार्गावर चालण्याचा दृढनिश्चयाचा तो दिवस म्हणजे बुधवार नऊ मे 1962.
श्रमण संघाचे द्वितीय पट्टधर आचार्य सम्राट पूज्य श्री आनंदऋषीजी महाराजांच्या सेवेत दीर्घकाळापर्यंत पूज्य प्रवर्तक श्रीजींनी समाज संघ हितोपयोगी विविध जबाबदाऱ्यांचे पालन केले. तसेच आनंद गुरु बरोबर त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब, जम्मू – काश्मीर अशा विविध राज्यांत पदभ्रमण करून जैन धर्माचा प्रचार प्रसार केला. सहज सरळ निरागस मधुर स्वभावामुळे तसेच आचार्य भगवंतांच्या हुबेहूब प्रति रुपामुळे पूज्य प्रवर्तक श्रीजींचे नाव श्रद्धाळूच्या मन पटलावर नेहमीच अग्रभागी असते.

अशा सुदीर्घ संयम पालक कुशल संघ संचालक गुरु आनंद शिष्य महाश्रमण साधक महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य श्री कुंदन ऋषीजी महाराज, यांचा 63 वा दीक्षा दिन साजरा करण्याचे सौभाग्य अहमदनगर श्री संघाला लाभले आहे. गुरुवारी नऊ मे 2024 रोजी सकाळी साडेआठ ते दहा पर्यंत गुरुगुणानुवाद सभा व दीक्षा दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच आनंदधामच्या प्रांगणात सायंकाळी सात ते साडेआठ या वेळेत वर्षीतप तपस्वी बंधू भगिनींच्या तप अनुमोदनेचा अर्थात् भावाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. तरी सर्व श्रावक श्राविकांनी दोन्ही कार्यक्रमांना जरूर उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ व तिलक रत्न जैन धार्मिक परीक्षा बोर्ड तर्फे करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version