Spread the love

 

ताई तुम्ही नक्की निवडून येणार मतदारांनीच व्यक्त केला विश्वास

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभेच्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार डॉ सुलक्षणा शिलवंत यांनी आज पिंपरी गाव व पिंपरी कॉलनी परिसरात आपली प्रचार मोहीम आखली होती. यावेळी सर्वसामान्य मतदारांनी डॉ सुलक्षणा शीलवंत यांना शुभेच्छा व्यक्त करत यावेळी विधानसभेमध्ये तुमच्यासारखी उच्चशिक्षित महिला नक्की विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला.
डॉ सुलक्षणा शिलवंत यांनी आज पिंपरी गावातील वैभव नगर तपोवन मंदिर परिसर वाघेरे कॉलनी माळी आळी नव महाराष्ट्र विद्यालय तसेच पिंपरी कॉलनी परिसरात मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. प्रामुख्याने शिवसेनेचे नेते माजी महापौर संजोग वाघेरे पाटील माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे माजी नगरसेवक विजय कापसे अरुण टाक, शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्रीरंग शिंदे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते दत्तात्रय वाघेरे आदींची त्यांनी भेट घेतली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version