Spread the love

 

शिरूर लोकसभेत शरद पवार घेणार पाच सभा, तर आदित्य ठाकरेंची होणार रॅली

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचारात रंगत यायला सुरुवात झाली आहे. आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षातले जेष्ठ नेते आता निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मैदानात उतरणार आहेत.

शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या एकूण पाच सभा होणार आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची भोसरी विधानसभेत 7 मे रोजी रॅली असणार आहे.

शिरुर-हवेली, हडपसर, आंबेगाव-शिरुर, खेड -आळंदी, जुन्नर या
विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची प्रत्येकी एक सभा होणार आहे.

*शिरूर लोकसभा मतदारसंघ, सभांचे नियोजन*

*शिरूर – हवेली विधानसभा*
२८ एप्रिल – उरळीकांचन, या. हवेली
*जुन्नर विधानसभा*
३० एप्रिल – ओतूर बाजार, ता. जुन्नर
*हडपसर विधानसभा*
६ मे – कात्रज
*भोसरी विधानसभा*
७ मे – मा. आदित्य ठाकरे यांची रॅली
*आंबेगाव – शिरूर विधानसभा*
८ मे – रांजणगाव, ता. शिरूर
*खेड – आळंदी विधानसभा*
१० मे – चाकण बाजार समिती आवार

Share.
Leave A Reply

Exit mobile version