Spread the love

गणपती दान आणि निर्माल्य दान उपक्रम

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका ब प्रभाग आणि संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त माननीय शेखर सिंह  व ब प्रभाग अधिकारी  अमित पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली रिवर व्ह्यू घाट बिर्ला हॉस्पिटल रोड चिंचवडगाव येथे पाचव्या दिवसाच्या गणेश विसर्जनाच्या दिवशी 668 गणेश मूर्तींचे दान मिळाले आणि दोन टन निर्माल्य स्वीकारले.या उपक्रमात प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडी चिंचवड पुणे काॅलेजचे एन एस एस चे विद्यार्थी सहभागी झाले होते.

या उपक्रमाचे संयोजन संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोहन गायकवाड विश्वास राऊत संजीत पद्मन भरत शिंदे मनोहर कड कविता वाल्हे अनुशा पै अरुण कळंबे रमेश भिसे नंदकिशोर खंडागळे शब्बीर मुजावर पुजा संनके यांनी केले होते पिंपरी चिंचवड ब प्रभाग अभियंता राजकुमार सूर्यवंशी चेतन देसले रसूल शेख रमेश कपूरे प्रविण शेळके अनिल ढाले यांनी सहकार्य केले

Share.
Leave A Reply

Exit mobile version