Spread the love

 

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे आणि ते प्रेरणादायी असावे याची जिद्द मनात बाळगून इंग्रजाच्या जुलमी राजवटीला संपवत नाना यांनी प्रतिसरकारची स्थापना केली गरिबांना न्याय देणे, हुंडाबंदी,वाचनालय, अस्पृश्यता निर्मूलन अशा विविध कामातून प्रतिसरकार द्वारे जनहित जोपासले असे मत राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार, नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशन, असंघटित कामगार विभाग तर्फे आज क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र करण्यात आले. यावेळी सोशल मीडियाचे सुरज देशमाने, उपाध्यक्ष राजेश माने, समन्वयक सुनिता पोतदार,अंजना रोडे, सलीम डांगे, वनिता गोरे, विजय कदम, अनुज शर्मा , शकील शेख आदी उपस्थित होते.

यावेळी नखाते म्हणाले की जुलमी इंग्रज सरकारच्या विरोधात बंड पुकारले आणि इंग्रजाला सळो की पळो करून सोडले. जुलमी इंग्रजाचे राज्य नष्ट व्हावे आणि जनतेला पूर्ण स्वातंत्र्य मिळावे यासाठी ब्रिटिशांच्या रेल्वे लूटून भूमिगत राहून आंदोलन छेडले यात ते अग्रणी होते. ब्रिटिश कालावधीमध्ये बंड पुकारणे अवघड होते अशा कालावधीमध्ये त्यांनी प्रतिसरकार स्थापन करून गोरगरीब शेतकरी कष्टकरी यांना न्याय देण्याची भूमिका घेतली विविध माध्यमातून समाजाचे कल्याण होईल याकडे त्यांनी लक्ष दिले. बापू लाड, नागनाथ अण्णा नायकवडी, केशवराव जेधे, कर्मवीर भाऊराव पाटील तुळशीदास जाधव अशा आदर्श व्यक्तीमत्वाच्या सानिध्यातून कार्य करत राहिले. दोन वेळा बीड लोकसभा मतदारसंघातून संसदेत मराठी भाषेतून आवाज उठवणारा खासदार म्हणून त्यांची ख्याती होती.

Share.
Leave A Reply

Exit mobile version