Spread the love

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित क्रांतिवीर चापेकर माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिक विभागांमध्ये (शनिवार, दिनांक २५ जानेवारी) राष्ट्रीय मतदार दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. मतदान करण्याविषयी जनजागृती म्हणून सर्व विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले. शुभांगी बडवे यांनी मतदान का करावे याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

या प्रसंगी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वासंती तिकोने, माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाच्या प्रभारी मुख्याध्यापिका वर्षा जाधव, खिवंसरा पाटील प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नटराज जगताप, सहशिक्षक बिभीषण चांडे, राजश्री पाटील, सुलभा झेंडे, शुभांगी बडवे, दीपाली शिंदे, सुलभा लोंढे, वैशाली कयापाक, तुषार बाहेकर, जगन्नाथ ढगे, सरला पाटील, सुधाकर हांडे, श्यामला वाघमारे, छाया सुरवसे, श्वेता उपाध्ये, मनोरंजना उफाड, बालवाडी विभागाच्या संध्या कुलकर्णी, अंकुश कांबळे, दादासाहेब खेडकर, अतिश गायकवाड, मयूर विश्वास, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अतुल आडे उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version