Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सद्गुरु नगर भोसरी येथे झालेल्या अपघातात पाच बांधकाम कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखदायक आणि संताप जनक आहे.

वास्तविक महाराष्ट्र शासन, ठेकेदार आणि महापालिकेचा बांधकाम परवाना विभाग यांच्या अक्षम्य चुकामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना वारंवार घडत आहेत याला प्रतिबंध घालण्यासाठी सुरक्षितता, सुरक्षिततेची साधने आणि सुरक्षा व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे.

कंपन्या आणि उद्योजकांना सरकार अभय देत असल्यामुळे असे प्रकार वारंवार घडत आहेत. सदरच्या घटनेमधील सर्वदोषीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी.सदर घटना दुर्दैवी आहे मृतांच्या नातेवाईकांना ताबडतोब प्रत्येकी दहा लाख रुपये अर्थसाह्य देण्यात यावे.

कामगार नेते काशिनाथ नखाते
अध्यक्ष कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र

Share.
Leave A Reply

Exit mobile version