कष्टकरी महिलांकडून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणी महात्मा जोतिराव फुले.यानी सन १८७३ साली सत्यशोधक सामाजाची स्थापना केली. याचा आदर्श आजही समाजापुढे आहे. भारतीय स्त्रीला वर्षानुवर्षं शिक्षणाची दारे बंद होती.सामाजिक वास्तवाचे कवच भेदून अचुक वेध घेत मुलींची पहिली शाळा काढून स्त्री सन्मान करत त्याना मुख्य प्रावाहात आणले असे प्रतिपादन कष्टकरी संघर्ष महासंघाच्या महिला अध्यक्षा माधुरी जलमुलवार यानी व्यक्त केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जेष्ठ कष्टकरी कामगार शिल्पा जानराव यांच्या हस्ते पुष्पहार घालून जयंती साजरी केली.
यावेळी छाया मोरे,केसर नादीर,द्रौपदी लोखंडे,कांता कांबळे,सोनाली कांबळे, वंदना मोरे,शकुंतला कांबळे,सविता सोनथे,छाया उघडे,सुरेख जाधव
संगीता लांडगे,सुरेखा जाधव राधा रसाळ, सविता रेवळ, हिना पठाण आदिसह शहरातील महिला उपस्थित होत्या.
सावित्रीबाईना टोळक्याकडून अनेकदा दगड फ़ेक, चिखलफ़ेक झाली मात्र या पवित्र शिक्षण कामात त्यानी बाधा येऊ दिला नाही.
अशिक्षीत पणामुळे असंघटीत कामगार क्षेत्रात आलेल्या महिला सावित्रीबाई चा आदर्श घेउन आज आपल्या क्षेत्रात काम करत आहेत.कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे प्रशिक्षण देऊन विधवा ,घरेलू कामगार, मजुर महिला ,फेरीवाला याना आर्थिक सामजिक , व व्यावसायिक दृष्ट्या साक्षर करुन त्याना सक्षम करण्यासाठी सुरुवात झाली आसुन याचा लाभ जास्तीत जास्त महिला पर्यंत पोहोचवण्यासाठी महासंघाचे पदाधिकारी प्रयत्न करतील असा जलमुलवार यानी व्यक्त केला.
प्रास्ताविक नम्रता जाधव यानी तर.आभार अर्चना कांबळे यानी मानले.














