ताज्या घडामोडीपिंपरी

एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएससी) २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस.बी. पाटील पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.

यामधे एकूण १९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ७० विद्यार्थी ९१ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून यश मिळवले. ६७ विद्यार्थ्यांनी ८१ टक्के पेक्षा जास्त गुण मिळविले.

अनिरुद्ध गुप्ता ९८.६%, धवला पाटील – ९८%, मानस सानप – ९७.८%, अद्विता कुरले ९७.६%, आदित्य ठोंबरे ९७.६%, हर्षवर्धन निमणकर ९६.८%, शिवम फुलपगारे ९६.८% यांनी विशेष प्राविण्य मिळवले. गणित या विषयामध्ये अनिरुद्ध गुप्ता, आदित्य ठोंबरे,अद्विता कुरले, धवला पाटील,हर्षवर्धन निमणकर या विद्यार्थ्यांनी आणि आर्यन भोसले याने सामाजिक शास्त्र या विषयात १०० गुण मिळवले.
एस. बी. पाटील स्कूलच्या प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी, चिंचवड ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button