‘एसबीसीएल २०२३ बॉक्स क्रिकेट स्पर्धे’तील अटीतटीच्या सामन्यात सिंहगड पलटणची बाजी

संतोष सौंदणकरांचा ‘शिवनेरी कींग्ज’ संघ ठरला उपविजेता
रावेत (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील आहेर सुवर्णकार समाज चेरीटेबल ट्रस्टच्या वतीने आज शनिवारी (दि. ३०) रोजी ‘एसबीसीएल २०२३ बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत चार टीमा सहभागी झाल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सामने सुरू करण्यात आले. अतिशय आनंदात आणि खेळीमेळीच्या वातावरणात क्रिकेट खेळण्याचा व सामने पाहण्याचा उपस्थितांनी आनंद लुटला.
रावेत येथील फोर लायन्स टर्फ क्लब च्या मैदानावर या स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. नोंदणी केलेल्या खेळाडूंच्या यादीमधून स्पर्धेत भगवान वानखेडे यांचा तोरणा टायटन, दिपक सोनार यांचा सिंहगड पलटण, संतोष सौंदणकर यांचा शिवनेरी किंग्ज आणि गणेश सोनार यांचा रायगड रॉयल हे चार संघ सहभागी झाले होते.
अंतिम फेरी सिंहगड पलटण विरुद्ध शिवनेरी कींग्ज यांच्यात रंगली. अटीतटीच्या सामन्यात सिंहगड पलटण या संघाने विजय प्राप्त केला. संतोष सौंदणकर यांचा शिवनेरी कींग्ज हा संघ उपविजेता ठरला. सर्वोतकृष्ट खेळाडूचा किताब संदीप सोनार यांना मिळाला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुवर्णकार समाज चेरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भगवान वानखेडे, गणेश सोनार,संतोष सौंदणकर, प्रवीण सोनार,कार्यकारिणी पदाधिकारी दीपक सोनार, स्मिता सोनार, कैलास पैठणकर, प्रविण दुसाने, प्रमोद काशीकर, शिवाजी सोनार, सुनील निकुंभ, सर्व खेळाडू, संघ मालक आदींनी सहभाग घेतला.









