Spread the love

 

आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे आकुर्डी येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयातील प्रा. भूषण मारुतीराव नानचे यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. ते मुळ गडहिंग्लजचे रहिवासी आहेत.राजस्थान येथील जे.जे.टी. विद्यापीठ येथून “मानवी क्रिया ओळखण्यासाठी हायब्रिड डीप लर्निंग मॉडेल” विषयावर त्यांनी संशोधन केले आहे.

वरील संशोधनसाठी त्यांचे आजपर्यंत ४ आंतरराष्ट्रीय व २ राष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध नामवंत व स्कोपस इंडेक्स्ड जर्नल्स मध्ये प्रसिध्द झाले आहेत.

या संशोधनसाठी मुंबईचे डॉ हिरेन दंड व डॉ भाग्यश्री टिंगरे यांचे मार्गदर्शन लाभले तर संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, विश्वस्त तेजस पाटील, संकुलाचे संचालक रियर एडमिरल अमित विक्रम(निवृत्त),प्राचार्या डॉ. पी. मालथी व कुलसचिव प्रशांत भालेराव यांचे प्रोत्साहन लाभले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version