Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आंबेगाव तालुक्यातील आदर्शगाव असणाऱ्या भागडी, येथे पुष्प वर्षाव करुन गावात जोरदार स्वागत केले. यावेळी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. गावातील पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी उत्सफुर्तपणे स्वागत सत्कार केले. यावेळी गावातील सर्वानी संपुर्ण गाव माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहील याची ग्वाही दिली.

यावेळी भिमाशंकर कारखाना अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, जिल्हा परिषदेचे सदस्य विवेक वळसे पाटील, शिवसेना गटनेते जिल्हा परिषद पुणे देविदास दरेकर, उपाध्यक्ष जिल्हा परिषद अरुण गिरे, सुनिल बाणखेले, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस विष्णू काका हिंगे, पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, उद्योजक संतोष डोके, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आंबेगाव निलेश थोरात, युवासेना जिल्हाप्रमुख प्रविण थोरात, युवासेना राष्ट्रिय कार्यकारीणी सदस्य सचिन बांगर, युवानेते अजितशेठ चव्हाण, शिरुर लोकसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सचिनभाऊ भोर, ज्येष्ठ नेते भाजप भाऊसाहेब भापकर, सरपंच गोपाळराव गवारी, माजी सरपंच वैभव थिटे, उपसरपंच लताताई उंडे, उद्योजक किसान शेठ उंडे, तबाजी शेठ उंडे, महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व आदी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version