ताज्या घडामोडीपिंपरी
येत्या दहा दिवसात कामगारांचा भविष्य निर्वाह निधी भरला नाही, तर युवासेनेकडून आंदोलनाचा इशारा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये कार्यरत महिला कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी (PF) अनेक वर्षांपासून भरला गेला नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. संबंधित ठेकेदार मे. सिंग कंपनीने कामगारांची फसवणूक करत त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर युवासेना शहर संघटक निलेश हाके यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे आरोग्य प्रमुख सचिन पवार यांना निवेदन देण्यात आले.
कामगारांच्या हक्कासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली असून, तोपर्यंत PF भरण्यात आला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवासेनेने दिला आहे. कंपनीच्या अनामत ठेवीतून कामगारांना तातडीने PF देण्याची मागणीही करण्यात आली आहे.













