‘त्या’ मुक्या प्राण्याच्या मृत्युच्या प्रश्नांबाबत महावितरण अजून ही गप्प – युवा नेते सुहास कुदळे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुक्या जनावराचा महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मृत्यूबाबत पत्र देऊन ७ दिवस झाले तरी काहीही उत्तर महावितरण कडून आलेले नाही, अशी तक्रार पिंपरी गावातील युवा नेते सुहास कुदळे यांनी महाराष्ट्र विद्युत महावितरण कंपनी लि.पिंपरी विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, महावितरण कंपनी लि.पिंपरी विभाग घडलेल्या घटनेला ७ दिवस उलटूनही महावितरण अधिकारी यांनी काहीच उत्तर दिले नाही. महावितरण अधिकारी व ठेकेदार हे मिली भगत असतील अशी खूप मोठी शक्यता नाकारता येत नाही. मुक्या जनावराचा महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू दिनांक १२ मे २०२५. वेळ रात्री ८.३० ते ९ वाजता (अंदाजे वेळ). वळवाच्या पावसामुळे मुके जनावर पावसातून बचाव होण्यासाठी निवारा शोधत होते. त्या मुक्या जनावरांनी वैभवनगर परिसरातील वैभवनगर फेज १ बिल्डिंग मधील बी १ बिल्डिंग शेजारी असलेल्या महावितरणच्या डी .पी .बॉक्सचा करंट लागून एका गाईचा नाहक बळी गेला आहे.म. ना. से. (शिस्त व अपील) नियम १९७९ अन्वये कलम-10(2) (3) नुसार शिस्तभंगाची कारवाई करावी असे ही म्हटले आहे.
प्रत्यक्ष डी .पी .बॉक्सची पाहणी केल्यानंतर डी. पी बॉक्सला करंट लागण्याचे कारणच काय हे आम्हाला समजले नाही. त्यामध्यें केबल शॉर्ट होणे ,आर्थिंग नसणे इत्यादी प्रकारची कारणे असू शकतात का?
पिंपरी विभाग महावितरण कंपनी यांच्याकडून पिंपरी परिसरातील डी .पी. बॉक्सच्या मेंटेन्ससाठी किती मुदतीआधी – किती कालावधी साठी ठेकेदारास मेंटेनन्सचे काम दिले होते ,किती डी. पी .बॉक्सचे मेंटेनन्स केले आहे व अंदाजे किती रुपये किमतीचे काम होते, तसेच घडलेल्या दुर्घटने बाबत योग्य ते लेखी उत्तर मिळाव यासाठी दिनांक १३/०५/२०२५ रोजी पत्र महावितरण पिंपरी विभाग कार्यालय यांना दिले होते. जे दोषी अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई साठी येरवडा येथील विद्युत सुरक्षा अधिकारी , महावितरण कंपनी वरिष्ठ अधिकारी रास्ता पेठ,महावितरण वरिष्ठ अधिकारी चतुर्शिंगी व पिंपरी पोलीस स्टेशन वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेऊन घडलेल्या घटनेचे सर्व पुरावे सादर करून त्यासंबंधितांवर कारवाई साठी पत्र देणार आहोत , व दोषींवर गो हत्या तसेच सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहोत.तसेच संबंधित टेंडरची माहिती लवकरच माहिती अधिकारी कायदा याच्या माध्यमातून मागवली जाईल. जे दोषी अधिकारी व ठेकेदार असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई होतं नाय तो पर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे ही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.













