ताज्या घडामोडीपिंपरी

कुटुंबसंस्था टिकवण्यासाठी परिचय मेळावे उत्तम पर्याय – माजी महापौर योगेश बहल

पिंपरी येथे खान्देश माळी मंडळाचा वधू, वर परिचय मेळावा संपन्न

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  स्पर्धेच्या काळात युवक, युवती करिअर करण्यासाठी जास्त वेळ घालवत आहेत. उच्च शिक्षण त्यानंतर नोकरी, व्यवसाय यामध्ये लग्नाचे वय वाढत आहे. त्यात वधू, वरांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अपेक्षा जुळणे कठीण होत जाते. कुटुंबसंस्था टिकवण्यासाठी असे वधू, वर परिचय मेळावे हा एक उत्तम पर्याय आहे. खान्देश माळी मंडळ आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले पाहिजे असे माजी महापौर योगेश बहल यांनी सांगितले.

खान्देश माळी मंडळ पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित केलेला अखिल माळी समाज २७ वा राज्यव्यापी भव्य वधु, वर, पालक परिचय मेळावा आचार्य अत्रे सभागृह पिंपरी, पुणे येथे संपन्न झाला यावेळी बहल बोलत यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी मेळाव्याचे अध्यक्ष गुलाब माळी, मंडळाचे अध्यक्ष नकुल महाजन, प्रा. कविता आल्हाट, प्रवीण महाजन, धुळे माळी महासंघाचे आर. के. माळी, मंडळाचे माजी अध्यक्ष पी. के. महाजन, नानाभाऊ माळी, वधू, वर समिती प्रमुख उदयभान पाटील, गणेश चौधरी, योगेश माळी, संस्थापक एस. के. माळी, मंडळाचे रमेश सोनवणे, प्रशांत महाजन, खजिनदार रवींद्र माळी, संघटक दीपक बागुल, रजनी वाघ, सुधाकर बोरसे, ज्ञानेश्वर वाघ, सुधीर‌ महाजन, जेष्ठ सल्लागार भिमराव माळी आदी उपस्थित होते. या मेळाव्यात डॉक्टर, इंजिनिअर, सीए, उच्चशिक्षित, सर्वसामान्य, पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक २५० पेक्षा अधिक युवक, युवतींनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गुलाब माळी म्हणाले की, गेली २७ वर्षे मंडळाने हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात सुरू ठेवला आहे याचे श्रेय मंडळांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आहे.
रमेश बिरारी, गोविंद माळी यांनी वधू, वराच्या मुलाखती व परिचय करून दिला.

किशोर वाघ, डी. के. माळी, नितीन देवरे, एस डी माळी, ज्ञानेश्वर महाजन, अनिल सोनवणे, विजय वाघ, किरण माळी, सुभाष देवरे, भरत सोनवणे, शशीकांत खलाणे, पंढरीनाथ महाजन, प्रदीप देवरे, भगवान माळी, निलेश खैरनार, पोपट पवार, सचिन आहीरे, खुशाल शेवाळे, राजेंद्र महाजन, विजय महाजन, सुभाष माळी, जितेंद्र चौधरी आणि सभासद यांनी आयोजनात सहभाग घेतला.

प्रास्ताविक नकुल महाजन यांनी केले.
सूत्रसंचालन नवल खैरनार, पुनम वाघ यांनी तर आभार भूषण मोरे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button