चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी
श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयामध्ये योग दिन साजरा

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विकास शिक्षण मंडळ संचालीत श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयामध्ये २१ जून योगा डे च्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी विविध योगा आसनांसोबत सूर्यनमस्कार साजरे केले.
याप्रसंगी उपस्थित संस्थेचे संचालक विजय जाधव, मुख्याध्यापक बाळाराम पाटील, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव,उप मुख्याध्यापिका सुषमा संधान मनीषा जाधव, छाया ओव्हाळ क्रीडा शिक्षक शब्बीर मोमीन, श्रीमती मुबारक मोमीन आदी शिक्षक वर्ग उपस्थित होते.












