चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

श्री प्राथमिक जैन विद्या मंदिर चिंचवड स्टेशन येथे योग दिन साजरा

Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री प्राथमिक जैन विद्या मंदिर चिंचवड स्टेशन येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .या कार्यक्रमास योग गुरु  कुमार कटके  यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शिशुविहार व इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग घेतला.जगाला आनंदी आणि सुदृढ करूया, चला सर्व योगाकडे वळूया.

 

सर्वांनी एकात्मतेने व मनःशांतीचा अनुभव घेतला. प्रशालेतील सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांबरोबर सहभागी झाले होते. योग साधनेच्या महत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला. सर्वांच्या आरोग्य व समृद्धीसाठी ओमकार जप करण्यात आला. योग जीवनशैली आहे व्यायाम नाही ही विचारधारा विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यात आली. या उपक्रमासाठी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे मानद सचिव  ॲड  राजेंद्रकुमार शंकरलाल मुथा व सहाय्यक सेक्रेटरी  प्राध्या. अनिलकुमार मोतीलाल कांकरिया यांनी मार्गदर्शन केले अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा काटकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button