यशवंत भोसले यांची संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्थेच्या अध्यक्षपदी निवड

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादित (९४१ घरे ) च्या अध्यक्षपदी यशवंतभाऊ भोसले यांची सर्व गाळेधारकांच्या वतीने सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीला अंकुश वाघमारे यांनी सूचक म्हणून मान्यता दिली. यावेळी संपूर्ण कार्यकारणीही जाहीर करण्यात आली.संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादित (९४१ घरे ) यांच्या साधारण सभा संत तुकाराम नगर येथील संत तुकाराम महाराज हॉल येथे (दि.२७) आयोजित करण्यात आली होती.
यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, संत तुकाराम नगर वसाहत ही सुमारे ९४१ घरे असलेली एक मोठी सोसायटी असून येथे गेली ४० वर्षे सर्वधर्मीय बांधवांनी प्रेमाने व बंधुभावाने एकत्र राहून बंधुता जपली आहे. सध्या ही वसाहत पुनर्विकास प्रक्रियेत असून, नवीन कायद्यानुसार ५१% सभासद संमतीची अट पूर्ण करत सोसायटीची नोंदणी करण्यात आली आहे. ७२% गाळे धारक सभासद झाले आहेत. उर्वरित गाळेधारक सामील होत आहेत. म्हाडाकडून सर्व औपचारिकता झालेंनंतर लवकरच येथील रहिवाशांना ९०० स्क्वेअर फूट एल.आय.जी. व १२०० स्क्वेअर फूट क्षेत्रफळाची घरे मिळावीत या करिताचा सोसायटीचा प्रस्ताव असून सध्याच्या १८० स्क्वेअर फूट घरांच्या तुलनेत हे मोठे परिवर्तन असेल आणि त्यामुळे रहिवाशांचे जीवनमान उंचावेल. सरकारने राबवलेल्या नवीन धोरणामुळे पुनर्वसन सहज शक्य झाले असून, त्याबद्दल सरकारचे आभार मानतो.संत तुकाराम नगर ही वसाहत ‘मिनी भारत’ म्हणून ओळखली जाते. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, तुकाराम महाराज गाता सप्ताह, गणपती उत्सव, मुस्लिम बांधवांची नमाज, तसेच ख्रिश्चन चर्चचे उत्सव इत्यादी कार्यक्रम एकोप्याने साजरे होतात. नव्या विकास प्रक्रियेत प्रत्येक इमारतीसाठी १० प्रतिनिधी नियुक्त करण्यात येणार आहेत, जे सोसायटीच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेणार आहेत.
समजभीमुख विकास प्रकल्पास खोडा घालण्याचे काम काही निहीत स्वार्थ पाहणारी मंडळी करत असून संत तुकाराम नगरच्या नागरिकांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी एकजुटीने या प्रकल्पास पाठिंबा दिलेला आहे.
सर्व सभासदांच्या वतीने सोसायटी सभासदांनी नूतन अध्यक्ष श्री यशवंतभाऊ भोसले यांच्या या कार्याचे कौतुक केले व सर्वांचे वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
नूतन कार्यकरणीचाही सत्कार सर्व सभासदांच्या वतीने करण्यात आला.












