ताज्या घडामोडीपिंपरी

जागतिक तंबाखू विरोधी दिन ; तंबाखूजन्य पदार्थ सेवन टाळावे- काशिनाथ नखाते

तंबाखूजन्य पदार्थांची होळी ; कामगारांचा व्यसनमुक्तीचा संकल्प

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अंगमेहनतीचे कामे आणि साधारण कामे , विविध प्रकारची कामे करत असताना विरंगुळा, तल्लफ म्हणून तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्या कामगाराकडून इतर कामगारांना काही प्रमाणात सवय जडते . मात्र तंबाखू , जर्दा , गुटखा , खैनी,मिश्री, सिगारेट, बिडी अशा प्रकारचे व्यसनाचे पदार्थ सेवन केल्याने अनेक कामगारांचे शारीरिक आरोग्य बिघडत आहे त्याचे दुष्परिणाम अनेक होत आहेत,कॅन्सर सारख्या भयानक रोगाने कामगारांचे मृत्यू होत आहे आणि सामाजिक स्वास्थ देखील हरपत जात असल्याने कष्टकरी, कामगारांनी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सोडावे असे मत कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे आज जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखूजन्य पदार्थांची होळी करत व्यसनमुक्त राहण्याचे आवाहन कामगारांना करण्यात आले यात काही कामगारांनी आजपासून व्यसन न करण्याचा निश्चय केला.

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, संघटक भास्कर राठोड,मनपा सदस्य सलीम डांगे, अनिल चव्हाण, मंगेश सावंत, खंडू कांबळे, प्रकाश इंगोले, जालिंदर कांबळे आदि उपस्थित होते.

तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणे, धूम्रपानामुळे, अमली पदार्थांच्या सेवनामुळे मृत्यू अथवा होणारी शरीराची हानी लवकर लक्षात येत नसली तरी त्याची जाणीव काही वर्षांनी होत असते व्यसन केल्याने क्षणात मृत्यू येत नाही हे खरे असले तरी व्यसनामुळे विविध रोगांनी आपल्या शरीर पोखरले जाते आणि ज्या वेळेला हे लक्षात येते त्यावेळी वेळ पुढे गेलेली असते, परिस्थिती हाताळणे कठीण जाते. तंबाखूजन्य पदार्थ यांची सहज उपलब्धता होते आता तर अमली पदार्थ सुद्धा मिळत आहे हे दुर्दैव आहे. विशेष बाब म्हणजे या पदार्थावरती कॅन्सर सारख्या रोगांचे आणि दुष्परिणामांचे फोटो व इशारा छापून येत असतो तरीसुद्धा याकडे व्यसन करणारी लोक दुर्लक्ष करीत असतात. एकत्रित येऊन कामगारांमध्ये चर्चा करून विचार मंथनमधूनच व्यसनाच्या बाबतीत चीड निर्माण करणे व रोखणे असे उपाय केल्यास व्यसनाचा प्रभाव कमी करण्यास मदत होईल.

त्याचबरोबर समाज म्हणून राष्ट्रासाठी हिताचे काम ठरणार आहे व्यसन करणाऱ्याला प्रोत्साहन देण्यापेक्षा त्याचा सोबती होण्यापेक्षा त्याला विरोध करण्याची भूमिका घेतल्यास अशा प्रकारचे व्यसनाच्या विळख्यात जाणाऱ्या समाजाला आपण रोखू शकतो ते रोखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचे आहे असेही नखाते यांनी नमूद केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button