ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

असंघटित कामगारांना ईएसआयसी बाबत लवकरच बैठक – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्यातील सर्व असंघटित कामगार यात घरेलू कामगार,फेरीवाला,रिक्षा चालक, कंत्राटी कामगार, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक चालक, कंत्राटी कामगार,अशा विविध कामगारांना ई एसआयसी योजना लागू केल्यास त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा आरोग्याचा मोठा प्रश्न सुटणार आहे व त्यांना लाभदायी ठरणार आहे म्हणून त्यांना ई एसआयसी लागू करण्याबाबत विचार व्हावा अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली असता याबाबत लवकरच बैठक घेऊ असे आश्वासन दिले.

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र,
महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती, नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समिती, सारथी चालक-मालक महासंघ यांच्याकडून आज प्राधिकरण निगडी येथे शिष्टमंडळाने आरोग्यमंत्री यांची भेट घेऊन निवेदन देऊन चर्चा केली .

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, युवराज निलवर्ण, सचिन नागणे,नाना कसबे, ओमप्रकाश मोरया आदि उपस्थित होते.

असंघटित कामगार यांना मिळणारे वेतन तुटपुंजे असते खर्च, शिक्षण आणि आरोग्याचा खर्च भागवता भागवता त्यांना मोठ्या अडचणीचां सामना करावा लागत आहे. कर्ता कामगार आजारी पडला तर आजारपणात ही त्यांना वेतनाच्या स्वरूपात मदत होऊ शकते. अपंगत्वासाठी मदत होऊ शकते कुटुंबातील अवलंबित व्यक्तींना सहाय्य मिळू शकते या सर्व बाबींचा विचार करून सदरची योजना लागू करावी अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी निवेदन देऊन चर्चेद्वारे केले असता आरोग्य मंत्री यांनी याबाबत लवकरच बैठक घेऊ असे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button