प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘वुई टुगेदर फाउंडेशन’तर्फे सैनिकांचा गौरव; चिंचवडमध्ये सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने सैनिकांचा सन्मान सोहळा चिंचवड येथील हॉलमध्ये उत्साहात पार पडला. भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा ध्वजास सलामी देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीताचे गायन झाले. फाउंडेशनच्या सहसचिव मंगला डोळे–सपकाळे व महिला समन्वयक अपर्णा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत सामूहिकरित्या सादर करण्यात आले.
या सोहळ्यात फाउंडेशनच्या वतीने सैनिकांचा यथोचित सत्कार करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, सैनिक हा देशाचा अभिमान असून तो कायम राहील. माजी सैनिक निवृत्तीनंतरही सामाजिक कार्यातून देशसेवा करत असतात. त्यांच्या कर्तृत्व, शिस्त आणि अनुभवाचा समाजाला निश्चितच लाभ होतो. त्यामुळे अशा माजी सैनिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने स्थान देणे आवश्यक आहे.
यावेळी उपस्थित सैनिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सेवाकाळातील अनुभव सांगितले. सलीम सय्यद यांनी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन मंगला डोळे–सपकाळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष रवींद्र काळे, सचिव जयंत कुलकर्णी, खजिनदार दिलीप चक्रे, सल्लागार रवींद्र सागडे, खुशाल दुसाने, महिला समन्वयक अपर्णा कुलकर्णी, सलीम सय्यद, संस्थापक क्रांतीकुमार कडूलकर, दारासिंह मन्हास, जावेद शेख, नंदकुमार वाडेकर, लता शिंदे, मेघना बेरी, दिलीप पेटकर, अर्जुन पाटोळे, विलास रासकर, सरिता कुलकर्णी, ओम सोनी, उदय कुलकर्णी, रोहिणी बच्चे, हनीफ सय्यद, अनिल पोरे, अनिल शिंदे, भावीन भंडारी, श्रावणी बच्चे, निलेश आकारे, शंकर कुलकर्णी, आसावरी बच्चे, विलास गटने, अशोक देशपांडे आदींनी मोलाचे योगदान दिले.
शेवटी फाउंडेशनचे सल्लागार खुशाल दुसाने यांनी आभार मानले.




















