चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

“कष्टकरी महिलांची दिवाळी उजळली — वुई टुगेदर फाउंडेशनचा निस्वार्थी ‘दिवाळी आनंद’ उपक्रम”

Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –

“सेवा हीच खरी पूजा” या भावनेतून कार्यरत वुई टुगेदर फाउंडेशन ने यंदाच्या दिवाळीत एक हृदयस्पर्शी आणि निस्वार्थी उपक्रम राबवला. समाजातील वंचित आणि कष्टकरी महिलांची दिवाळी गोड करण्याचा संकल्प फाउंडेशनने केला आणि तो यशस्वीपणे पूर्ण केला.

या उपक्रमांतर्गत कष्टकरी महिलांना सन्मानपूर्वक दिवाळी फराळ, मिठाई, रोख मदत, पणत्या आणि दिवे यांचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाची लकेर उमटली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मंथन फाउंडेशनच्या आशा भट्ट–वेलणकर आणि कायदेतज्ञ मनीषा महाजन उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी केले. त्यांनी फाउंडेशनच्या निस्वार्थी समाजोपयोगी उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.

सहसचिव मंगला डोळे–सपकाळे यांनी सुरेख सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपाध्यक्षा सोनाली मन्हास, सल्लागार रवींद्र सागडे, खजिनदार दिलीप चक्रे, लायन्स क्लब अध्यक्ष रवींद्र काळे, क्रांती कुमार कडूलकर, रवींद्र साबळे, जयंत कुलकर्णी, सलीम सय्यद, धनंजय मांडके, उधळमकर, अनिल शिंदे, खुशाल दुसाने, दारासिंग मन्हास, अपर्णा कुलकर्णी, सदाशिव गुरव, अनिल पोरे, मधुकर वाडेकर, विलास घटने, श्रीराम दाते, दिलीप पेटकर, जयवंत राऊत, झाकीर सय्यद, आसावरी बच्चे आदी पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

या निमित्ताने उपस्थित महिलांनी आपले मनोगत व्यक्त करताना फाउंडेशनच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी सचिव जयंत कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

वुई टुगेदर फाउंडेशनचा हा उपक्रम समाजातील वंचित घटकांच्या आयुष्यात आनंदाचे किरण पसरवणारा ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button