दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेत गणेशोत्सवाचे जल्लोषात स्वागत”

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गणेशोत्सवाचे स्वागत अनेक ठिकाणी विविध उपक्रमांनी केले जाते, पण काही ठिकाणी हा उत्सव वेगळ्याच पद्धतीने साजरा केला जातो. अशाच एका आगळ्या दिव्यांग मुलांच्या शाळेत, आभिराज फाउंडेशन मध्ये, गणेश स्थापना मोठ्या जल्लोषात पार पडली.
या वेळी वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. त्यांच्यासोबत सहसचिव मंगला डोळे-सपकाळे, सलीम सय्यद, सल्लागार रवींद्र सांगडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. दिव्यांग विद्यार्थी आणि शिक्षक वर्गानेही मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
वुई टुगेदर फाउंडेशनचे सदस्य वेळोवेळी आभिराज फाउंडेशनमध्ये येऊन विद्यार्थ्यांना सहकार्य करतात. यावेळी अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या कला, आवडीनिवडी जाणून घेतल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी आभिराज फाउंडेशनचे डायरेक्टर रमेश मुसुडगे यांनी उपस्थित मान्यवरांचे सत्कार करून आभार मानले.













