चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी
सतत पाठपुराव्यानंतर गावडे जलतरण तलाव अखेर सुरू – वुई टुगेदर फाउंडेशन आणि विजय गावडे सोशल फाउंडेशनचा विजय

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवडगाव येथील स्व. बाळासाहेब विठोबा गावडे जलतरण तलाव गेल्या दोन महिन्यांपासून नादुरुस्त स्थितीत बंद होता. या समस्येची दखल घेत महावितरण समिती सदस्य व वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे तसेच भारत केसरी पै. विजय गावडे सोशल फाउंडेशन यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.
तलाव वेळेत सुरू न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. परंतु, क्रीडा उपायुक्त पंकज पाटील यांनी काही तांत्रिक अडचणी सांगत थोडा वेळ मागितला. मधुकर बच्चे यांनी उपोषण थांबवून पाठपुरावा सुरूच ठेवला आणि अखेर जलतरण तलाव 15 जुलै रोजी सकाळी 6 वाजता मधुकर बच्चे आणि पै. विजय गावडे यांच्या हस्ते जलपूजन, नारळ फोडून आणि पहिल्या बॅचसह सुरु करण्यात आला.
तलाव पुन्हा सुरु झाल्यामुळे पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून उपस्थितांनी एकमेकांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष रवींद्र काळे, वुई टुगेदर फाउंडेशनचे सलीम सय्यद, जयंत कुलकर्णी, दिलीप चक्रे, अनिल गावडे, दिनेश राजपूत, जाकीर सय्यद, नंदकुमार वाडेकर, विलास रासकर, अर्जुन पाटोळे, प्रमोद आढाव, दीपक तरडे, अतुल गुजर, निलेश आवारे, झेंडे तोष्णीवाल, राऊत, संध्या मॅडम, वासंती काळे आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
क्रीडा उपायुक्त पंकज पाटील यांनी व्यक्तिगत लक्ष घालून अडचणी कौशल्याने सोडवल्याबद्दल नागरिकांतून त्यांचे आभार मानले जात आहेत.














