वुई टुगेदर फाउंडेशनकडून आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीचा हात”

फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी सर्वांचे स्वागत करून विद्यार्थ्यांशी सवांद साधत या विद्यार्थ्यांनी सुद्धा समाजिक बांधिलकी जपली पाहिजे,आपले आई वडील,गुरुजन,मार्गदर्शक यांचा योग्य सन्मान केला पाहिजे आदर्श ठेवला पाहिजे व समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हे कायम लक्षात ठेवले पाहिजे असे बच्चे यांनी आपले मनोगत व्यक्त केले
यावेळी अध्यक्ष मधुकर बच्चे, संस्थापक क्रांती कुमार कडुलकर, उपाध्यक्ष सोनाली मन्हास,सल्लागार रवींद्र,खजिनदार दिलीप चक्रे, दारासिंग मन्हास, सलीम सय्यद,प्रा.मेघना भोसले, विलास गटने, विलास जगताप, अरविंद पाटील, खुशाल दुसाने, परमानंद सोनी, धनराज गवळी, शंकर कुलकर्णी, मोहम्मद शेख, जाकीर सय्यद, मुकुंद इनामदार, जावेद शेख, अर्जुन पाटोळे, सुरेंद्र जगताप, रवींद्र इंगळे, रवींद्र शेटे, अभिजीत सागडे, हर्षदा सागडे, अनिल गोरे, धनंजय मांडके, वासंती काळे, प्रसाद कुलकर्णी, हनीफ सय्यद,अभिजीत,कुलकर्णी,अर्चना कुलकर्णी,नंदकुमार वाडेकर, असावरी बच्चे, रकेशा जैन,श्रावणी बच्चे,यश डोळे,दत्तात्रय सातव,स्मिता बागल, आदी प्रमुख पदाधिकारी सदस्य व विद्यार्थी , पालक उपस्थित होते. उपाध्यक्षा सोनाली मन्हास यांनी शिक्षणाचे महत्व अधोरेखित करीत सूत्रसंचालन केले.सहसचिव मंगला डोळे – सपकाळे यांनी सुमधुर आवाजात सामुदायिक पसायदान केले.धनंजय मांडके यांनी आभार मानले.












