ताज्या घडामोडीपिंपरी

वारकरी सेवा संघाच्या वतीने ह.भ. प. देवेंद्र निढाळकर महाराज यांचा ‘वारकरी सेवा सन्मान’ पुरस्काराने सन्मान

Spread the love

जुन्या हस्तलिखित ग्रंथात संतांचे शेकडो अभंग : देवेंद्र महाराज निढाळकर

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जुन्या हस्तलिखित ग्रंथात संतांचे शेकडो अभंग असून, अद्याप ते अप्रकाशित आहेत. विविध हस्तलिखितांमध्ये मला अनेक अभंग सापडले आहेत. दुर्मिळ हस्तलिखितांचे अनेक संशोधक निर्माण होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन दुर्मिळ हस्तलिखितांचे संग्राहक ह. भ. प. देवेंद्र महाराज निढाळकर यांनी केले.

जुनी सांगवीतील मारुती मंदिरात दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या गाथचे चिंतन सत्र संपन्न होते. संतसाहित्याचे अभ्यासक ह. भ.प. सचिन पवार महाराज हे गाथेचे निरूपण करतात. वारकरी सेवा संघ, पिंपरी चिंचवड यांच्या वतीने ‘वारकरी सेवा सन्मान’ पुरस्कार देऊन ह.भ. प. देवेंद्र निढाळकर महाराज यांना सन्मानित करण्यात आले. तसेच श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे सदस्य जगन्नाथ नाटक पाटील यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. हा सन्मान आळंदीच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर, ॲड. राजेंद्र उमाप, ॲड. रोहिणीताई पवार, ह.भ.प. पुरुषोत्तम पाटील आणि सांगवी ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यांच्या नवनिर्वाचित विश्वस्तांचा वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष सौरभ शिंदे आणि सांगवी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी मारुती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक ढोरे, वृक्षमित्र अरुण पवार, बाळासाहेब शितोळे, विलास बालवडकर, मंगेश कदम, निषाद ढोरे, संजय ढोरे, रुपेश बालवडकर, रमेश ढोरे, हर्षल काटे, लक्ष्मण घुले, महेश इंगवले, गहिनीनाथ कळमकर, ॲड. सौरभ बिराजदार, वारकरी उपस्थित होते.
पारंपरिक वारकरी भजनाच्या चाली व प्राचीन ग्रंथसंपदा यांचा अलौकिक ठेवा ह.भ.प. देवेंद्र निढाळकर महाराज यांनी जतन केला आहे.

सुमारे २५ हजार दुर्मिळ ग्रंथांचे ग्रंथालय त्यांनी उभारले आहे. ह. भ. प. निढाळकर महाराज यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याबद्दल वारकरी सेवा सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आले.
भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने विविध उपक्रम रबविण्यात येतात. यामध्ये पुढाकार घेऊन कार्य केल्याबद्दल जगनाथ नाटक पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button