ताज्या घडामोडीपिंपरी

“एक बार दिल से… नितीन आप्पा फिर से!” – प्रभाग ३ मध्ये विकासाची हॅट्रिक घडवणाऱ्या माजी महापौर नितीनआप्पा काळजे यांची जनतेत प्रचंड लोकप्रियता

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात प्रभाग क्रमांक ३ हे नाव घेताच ज्या व्यक्तिमत्त्वाची सर्वप्रथम आठवण होते, ते म्हणजे माजी महापौर नितीनआप्पा काळजे. समाजकारणातून राजकारणात आलेले, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे आणि विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून नितीनआप्पा काळजे यांनी गेल्या दोन दशकांत प्रभाग ३ मध्ये वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

मागील सुमारे २० वर्षांपासून नितीनआप्पा काळजे सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. प्रभागातील नागरिकांचे सामाजिक प्रश्न, वैयक्तिक अडचणी, शेतकरी, भूमिपुत्र, व्यापारी तसेच सर्वसामान्य रहिवासी यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली. कोणताही भेदभाव न करता सर्व घटकांना समान न्याय देण्याची त्यांची भूमिका प्रभागातील जनतेच्या विश्वासाचा पाया ठरली.

याच जनविश्वासाच्या बळावर २०१२ साली ते प्रभाग क्रमांक ३ मधून निवडून येत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून दाखल झाले. मात्र त्या काळात अपेक्षित विकास न झाल्याची खंत त्यांच्या मनात कायम होती. तरीही त्यांनी सामाजिक भूमिका सोडली नाही. पुढील पाच वर्षे प्रभागाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत राहिले. अखेर प्रभागावर होणारी अवहेलना लक्षात घेता, त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत विकासासाठी नवा राजकीय मार्ग स्वीकारला.

२०१७ साली भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आणि शहराच्या प्रथम नागरिकपदी विराजमान होण्याची संधी नितीनआप्पा काळजे यांना मिळाली. याच क्षणापासून प्रभाग क्रमांक ३ मध्ये विकासाच्या “पाऊलखुणा” स्पष्टपणे दिसू लागल्या.

आळंदी तीर्थक्षेत्रालगत असलेला, विकासापासून अनेक वर्षे वंचित राहिलेला प्रभाग ३ हा त्यांच्या मनातील जिव्हाळ्याचा विषय होता. महानगरपालिकेच्या इतर विकसित भागांच्या तुलनेत हा प्रभाग मागे पडल्याची खदखद त्यांच्या मनात होती. महापौर पदाच्या कारकिर्दीत त्यांनी हीच खदखद विकासाच्या कामांतून दूर केली.
नितीनआप्पा काळजे यांच्या कार्यकाळात सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा निधी प्रभाग ३ मध्ये विकासासाठी खर्च झाला. मंजूर विकास आराखड्यातील डीपी रस्ते, विशेषतः बहुचर्चित ९० मीटर रुंद रस्ता, क्रीडासंकुल, श्री संत ज्ञानेश्वर महाराज जलतरण तलाव, पालखी मार्गावरील भव्य समूह शिल्प, स्मशानभूमी, अग्निशामन केंद्र, वाघेश्वर मंदिर परिसराचा विकास, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, अद्ययावत जिम, प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच शिक्षण संस्थांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासारखी अनेक महत्त्वाची कामे त्यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाली.

यामुळेच आज प्रभागातील जनता अभिमानाने म्हणते –
“एक बार दिल से… नितीन आप्पा फिर से!”
आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग ३ साठी अधिकृत उमेदवार म्हणून नितीनआप्पा काळजे, सचिनभाऊ तापकीर, सौ. अर्चना सस्ते आणि सौ. सारिका गायकवाड यांचे पॅनल मैदानात उतरले आहे. विकासकामांचा भक्कम पाया, जनतेचा विश्वास आणि संघटित नेतृत्व पाहता या पॅनलचा एकतर्फी विजय निश्चित मानला जात असून नितीनआप्पा काळजे यांची हॅट्रिक होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.

हे कोणाचे स्वमत नसून,
हेच जनमत आहे… आणि तेच निर्णायक ठरणार आहे!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button