“विकास आमचा ध्यास”चा गजर; चऱ्होलीत नितीनआप्पा काळजेंच्या प्रचाराने विरोधक गारद

चऱ्होली बु., (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत चऱ्होली बु. प्रभाग क्रमांक ३ मध्ये भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या उमेदवारांनी प्रचाराच्या तिसऱ्या टप्प्यातच निर्णायक आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
“विकास आमचा ध्यास, जनता आमचा विश्वास” या घोषवाक्यासह मैदानात उतरलेल्या मा.महापौर तथा उमेदवार मा. नितीनआप्पा काळजे यांच्या प्रचार फेरीला ज्येष्ठ नागरिक, महिला, युवकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
मोशी येथील जांभुळकर वस्ती, आदर्शनगर, शिवाजीवाडी व परिसरात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार रॅलीने अक्षरशः वातावरण तापवले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, महिलांकडून औक्षण आणि “जय भाजप”, “जय महायुती”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
मा. नितीनआप्पा काळजे यांच्यासह सचिनभाऊ तापकीर, सौ. अर्चना सस्ते व सौ. सारिका गायकवाड यांनी घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत संपूर्ण प्रभाग पिंजून काढला.
प्रभागातील नागरिक आज अभिमानाने सांगत आहेत की, दहा वर्षांपूर्वीचा विकासवंचित प्रभाग आणि आजचा प्रगत प्रभाग यामधील फरक लपून राहिलेला नाही.
भोसरी विधानसभेचे आमदार महेशलांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महापौरपदाची संधी मिळाल्यानंतर नितीनआप्पा काळजे यांनी त्या संधीचे ‘सोनं’ करत रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीज, नागरी सुविधा व सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून परिसराचे चित्र बदलले, अशी ठाम भावना नागरिकांमध्ये आहे.
“काम बोलतं, म्हणूनच जनता साथ देते,” असे म्हणत मतदारांनी विकासकामांची हीच परतफेड आता मतपेटीतून करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे, हॅट्रिक विजयाची संधी आता महायुतीसमोर असून, चारही उमेदवारांची विकासकामे हीच त्यांची सर्वात मोठी ताकद ठरत असल्याचे चित्र आहे.
या प्रचारादरम्यान चऱ्होली मंडळातील भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता, “१६ तारखेला भाजपच्या चारही उमेदवारांवर विजयाचा गुलाल उधळणारच,” असा ठाम विश्वास मतदार बंधू-भगिनींनी व्यक्त केला.
चऱ्होली बु. प्रभाग क्र. ३ मध्ये महायुतीचा विजय आता केवळ औपचारिकताच उरली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.




















