ताज्या घडामोडीपिंपरी

चऱ्होली बु. प्रभाग ३ मध्ये भाजप प्रचाराचा झंझावात; महायुतीला निर्णायक आघाडीचे संकेत

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत चऱ्होली बु. प्रभाग क्रमांक ३ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली असून, ज्येष्ठ नागरिकांसह तरुणाईचा उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात प्रभागातील सर्वच रस्ते भाजपमय झाल्याचे चित्र दिसून आले असून, महायुतीच्या उमेदवारांनी निवडणूक रणांगणात निर्णायक आघाडी घेतल्याचे संकेत मिळत आहेत.

वडमुखवाडी येथे पद्मावती देवीच्या चरणी नतमस्तक होत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी महापौर व उमेदवार मा. नितीनआप्पा काळजे, भाजप शहर कोषाध्यक्ष सचिनभाऊ श्रीधर तापकीर, सर्वसाधारण महिला गटातून सौ. अर्चनाताई राजेश सस्ते तसेच अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून सौ. सारिका रवींद्र गायकवाड यांनी प्रचाराला सुरुवात केली. सकाळच्या सत्रात वडमुखवाडी गावठाण व जगताप वस्ती तर संध्याकाळच्या सत्रात चोवीसावाडी गावठाण, ताजणे मळा, काळजेवाडी गावठाण व परिसरात प्रचार रॅली काढण्यात आली.
प्रत्येक वाडी–वस्तीमध्ये उमेदवारांचे आगमन होताच ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि महिला भगिनींकडून औक्षण करत जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रचारादरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उमेदवारांशी थेट संवाद साधला.

मागील दहा वर्षांतील चऱ्होली बु. परिसरातील बदलांवर नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासापासून वंचित असलेल्या या भागाला महापालिकेत प्रतिनिधित्व मिळाले आणि माजी महापौर नितीनआप्पा काळजे यांच्या नेतृत्वाखाली विकासाची गती वाढल्याचे नागरिकांचे मत आहे. पायाभूत सुविधा, रस्ते, नागरी सोयीसुविधा आणि मूलभूत विकासकामांमुळे परिसराचा चेहरामोहरा बदलल्याचे चित्र आहे.

याच विकासकामांच्या जोरावर नितीनआप्पा काळजे यांची हॅट्रिक निश्चित असल्याचा विश्वास मतदार व्यक्त करत असून, चारही उमेदवारांसाठी ही कामे मोठी जमेची बाजू ठरत आहेत. प्रचारावेळी भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता, येत्या १६ तारखेला भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांवर विजयाचा गुलाल उधळला जाईल, असा ठाम विश्वास मतदार बंधू–भगिनींनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button