चऱ्होली बु. प्रभाग ३ मध्ये भाजपचा ‘हाय व्होल्टेज’ प्रचार, प्रचार फेरीतून विजयाचा आत्मविश्वास
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चऱ्होली बु. प्रभाग क्रमांक ३ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचार फेरीला नागरिकांचा उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात प्रभागातील रस्ते भाजपमय झाले असून, महायुतीच्या उमेदवारांनी निवडणूक रणांगणात निर्णायक आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.
या प्रचाराचा शुभारंभ पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेचे पहिले माजी महापौर व स्थानिक लोकप्रतिनिधी मा. नितीनआप्पा काळजे, भाजप शहर कोषाध्यक्ष श्री. सचिनभाऊ श्रीधर तापकीर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या जल्लोषात झाला. यावेळी भाजपच्या उमेदवार सौ. अर्चनाताई राजेश सस्ते आणि सारिका रवींद्र गायकवाड यांनी प्रचाराला अधिकृत सुरुवात केली.
प्रचार रॅलीदरम्यान बुर्डे वस्ती, निकम वस्ती, चऱ्होली गावठाण, काळीभिंत परिसर, गंधर्वनगरी, मोशी गावठाण, कोतवालवाडी, काळजेवाडी, गंधर्व पार्क, गजरा पार्क, शिवसृष्टी पार्क, सिद्धिविनायक नगर, साई अंगण, भोसले वस्ती, रासकर वस्ती, फुले वस्ती आदी संपूर्ण परिसर महायुतीच्या उमेदवारांनी अक्षरशः पिंजून काढला. प्रत्येक वाडी–वस्तीमध्ये उमेदवारांचे आगमन होताच ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि महिला भगिनींकडून औक्षण करत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
या प्रचार फेरीचे नेतृत्व भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. मागील दशकात त्यांच्या नेतृत्वाखाली झालेला सर्वांगीण विकास तसेच मा. नितीनआप्पा काळजे यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेली विकासकामे ही चारही उमेदवारांसाठी मोठी जमेची बाजू ठरत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
या वेळी चऱ्होली मंडळातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता, येत्या १६ तारखेला भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांवर विजयाचा गुलाल उधळला जाणार, असा ठाम विश्वास मतदार बंधू–भगिनींनी व्यक्त केला. चऱ्होली बु. प्रभाग क्र. ३ मध्ये भाजपने प्रचाराच्या माध्यमातून आपली ताकद ठामपणे दाखवून दिल्याचे स्पष्ट झाले आहे.




















