ताज्या घडामोडीपिंपरी

प्रभाग २८ मध्ये भाजपच्या उमेदवारांसाठी महिलांची संघटित ताकद ठरणार ‘गेमचेंजर’

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ मधील भाजपच्या उमेदवारांसाठी महिलांची एकजूट ही यंदाच्या निवडणुकीतील महत्त्वाची राजकीय घडामोड ठरत आहे. प्रभागातील गृहिणी, नोकरदार महिला, तरुणी, महिला बचत गट आणि विविध सामाजिक संघटनांच्या महिला एकत्र येत भाजपचे उमेदवार शत्रुघ्न काटे, अनिता संदीप काटे, संदेश काटे आणि डॉ. कुंदा भिसे यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्याचे चित्र दिसून येत आहे.

ही महिला एकजूट केवळ भावनिक पाठिंब्यापुरती मर्यादित नसून, महिला सुरक्षा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या मुद्द्यांवर आधारित आहे. “महिलांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणारे आणि त्यावर कृती करणारे नेतृत्व आम्हाला हवे आहे,” अशी स्पष्ट भूमिका महिलांनी मांडली आहे.
भाजपच्या या चारही उमेदवारांनी गेल्या काळात महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने संवाद साधला आहे. महिला बचत गटांना पाठबळ, आरोग्य शिबिरांचे आयोजन, अंगणवाडी व शालेय सुविधांमध्ये सुधारणा, तसेच सुरक्षित सार्वजनिक जागांसाठी केलेले प्रयत्न यामुळे महिलांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. डॉ. कुंदा भिसे यांचे सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील योगदान, तर अनिता संदीप काटे यांची महिलांशी असलेली थेट संवादाची भूमिका महिलांना विशेष भावली आहे.

या महिला पाठिंब्याला शत्रुघ्न काटे यांचे अनुभवसंपन्न नेतृत्व आणि संदेश काटे यांची तरुणाईशी असलेली मजबूत पकड अधिक बळ देत आहे. सध्या प्रचारात महिला स्वतः पुढाकार घेऊन घराघरांत संपर्क, छोट्या बैठका, मतदार जनजागृती आणि प्रचार नियोजनात सक्रिय भूमिका बजावत आहेत.

राजकीय जाणकारांच्या मते, प्रभाग २८ मध्ये भाजपच्या उमेदवारांसाठी उभी राहिलेली महिलांची संघटित ताकद ‘गेमचेंजर’ ठरण्याची दाट शक्यता आहे. पारंपरिक प्रचाराच्या चौकटीबाहेर जाऊन महिलांनी उचललेली ही जबाबदारी मतदारांवर सकारात्मक प्रभाव टाकत आहे.
सध्या प्रभाग २८ मध्ये “महिलांची एकजूट म्हणजे भाजपच्या विजयाचा कणा” अशी चर्चा रंगत असून, या संघटित महिलाशक्तीमुळे भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराला नवी धार मिळाली आहे. आगामी निकालात महिलांची ही एकजूट निर्णायक ठरणार, असेच राजकीय चित्र स्पष्ट होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button