ताज्या घडामोडीपिंपरी

“शिक्षणाच्या बळावर विकासाची लढाई” – प्रभाग २८ मध्ये अनिता संदीप काटे यांचा सर्वांगीण विकासाचा ठाम अजेंडा

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपळे सौदागर रहाटणी प्रभाग क्रमांक २८ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत महिला उमेदवार सौ. अनिता संदीप काटे यांनी आपला प्रचार पूर्णतः विकासकेंद्रित ठेवत मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या अनिता काटे यांनी शिक्षणाला विकासाची किल्ली मानत प्रभागाच्या सर्वांगीण परिवर्तनाचा निर्धार व्यक्त केला आहे.

प्रचारादरम्यान प्रभागातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या नागरी समस्या, मूलभूत सुविधांचा अभाव, असुरक्षिततेची भावना आणि नियोजनाअभावी रखडलेला विकास हे मुद्दे ठळकपणे पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देणारे निर्णय, सुरक्षित व सुव्यवस्थित परिसर आणि नियोजनबद्ध विकास हेच आपल्या प्रचाराचे केंद्र असल्याचे अनिताताई काटे यांनी स्पष्ट केले.

“शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणातून सक्षम नागरिक घडतात आणि त्यातूनच खरा विकास साधता येतो,” असे ठाम मत व्यक्त करत त्यांनी प्रभागात शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि मूलभूत सुविधा यांचा समतोल विकास घडवण्याचा संकल्प केला आहे.

गुन्हेगारीमुक्त प्रभाग उभारण्याचा निर्धार व्यक्त करत अनिताताई काटे यांनी सांगितले की, नागरिकांना त्रास देणाऱ्या व दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई केली जाईल. महिलांची सुरक्षितता, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि युवकांना सकारात्मक दिशा देणे हे त्यांच्या राजकीय अजेंड्याचे प्रमुख मुद्दे असतील.

प्रभागातील रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याच्या समस्या, खेळाच्या मैदानांचा अभाव आणि आरक्षित भूखंडांचा अपुरा विकास या प्रश्नांवर ठोस व कालबद्ध उपाययोजना राबवण्याचे आश्वासन देताना त्यांनी सांगितले की, “रस्ते, पाणी, मैदाने आणि आरक्षित भूखंडांचा नियोजनबद्ध विकास करून प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्याचा आमचा संकल्प आहे.”

नागरिकांशी थेट संवाद, त्यांच्या अडचणी ऐकून घेणे आणि त्या वेळेत सोडवणे हीच आपली कार्यपद्धती राहील, असा विश्वास व्यक्त करत अनिताताई काटे यांनी प्रभाग क्रमांक २८ च्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण कटिबद्ध असल्याचे ठामपणे सांगितले.
येत्या गुरुवार, दि. १५ रोजी होणाऱ्या मतदानात अनुक्रमांक १ समोरील ‘कमळ’ चिन्हाला मतदान करून विकासाच्या या लढाईत आपल्याला विजयी करण्याचे आवाहन सौ. अनिता संदीप काटे यांनी प्रभागातील मतदारांना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button