ताज्या घडामोडीपिंपरी

“क्रीडा, पर्यावरण, पादचारी हक्क ते शिक्षणापर्यंत; पिंपळे निलख–वाकडसाठी विकासाचा ठोस आराखडा जाहीर”

“योग्य उमेदवार निवडीचा संदेश; शतनु विलास नांदगुडे यांचा सर्वसमावेशक विकासाचा जाहीरनामा”

Spread the love

 

पिंपळे निलख , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपळे निलख व वाकड परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शंतनू नांदगुडे, या उमेदवारांनी सविस्तर व लोकाभिमुख जाहीरनामा प्रसिद्ध केला. केवळ राजकीय पक्ष किंवा विचारसरणी बदलण्याऐवजी योग्य, सक्षम आणि जबाबदार उमेदवार निवडण्याचे महत्त्व अधोरेखित करत या जाहीरनाम्यात समाजहिताला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.

या जाहीरनाम्यात क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी मजबूत क्रीडा परिसंस्था व आधुनिक पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी समर्पित मार्ग, हक्कांची अंमलबजावणी आणि वाहतूक नियोजनात पादचाऱ्यांना प्राधान्य देण्याचा स्पष्ट निर्धार नांदगुडे यांनी व्यक्त केला आहे. संघटित व्यापारासाठी स्वतंत्र फेरीवाला क्षेत्रे व नियोजित आठवडी बाजार उभारण्याचा संकल्प मांडण्यात आला आहे.

शाश्वत विकासाच्या दृष्टीने दीर्घकालीन, सर्वसमावेशक शहरी नियोजन, प्रशासनात पारदर्शकता, कार्यक्षमता व जबाबदारी सुनिश्चित करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. पर्यावरण संरक्षणासाठी सातत्यपूर्ण उपाययोजना, मुळा नदीचे पुनरुज्जीवन, हवेच्या गुणवत्तेबाबत (AQI) जनजागृती व प्रभावी कृती या मुद्द्यांचा समावेश आहे. स्थानिक जैवविविधतेच्या संवर्धनासाठी भौगोलिक टॅगिंग प्रणाली राबवण्याचा अभिनव विचारही मांडण्यात आला आहे.

कल्याणकारी उपक्रमांतर्गत सामुदायिक आरोग्यासाठी योग व ध्यान उपक्रमांना प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक परीक्षांचे मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करून देणे, तसेच पिंपळे निलख–वाकड परिसरातील सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याचा निर्धार जाहीरनाम्यात नमूद आहे. शंतनू नांदगुडे हे फक्त राजकीय पार्श्वभूमी असलेले व्यक्तिमत्व नसून ते सण २०१८ पासून जनहित याचिका माध्यमातून संस्कृती ठेवा जपण्यासाठी व
राजकीय सुधारणा करण्यासाठी ते कार्यरत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button