ताज्या घडामोडीपिंपरी

प्रभाग २५ मध्ये चेतन पवार यांचा प्रचार ‘हाय व्होल्टेज’ ; महिलांचा कौल, जनतेत वाढती चर्चा

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असताना, प्रभाग क्रमांक २५ (वाकड–ताथवडे–पुनावळे) मध्ये राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. या प्रभागातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार चेतन पवार यांनी आक्रमक आणि नियोजनबद्ध प्रचाराच्या जोरावर निवडणूक रिंगणात आघाडी घेतल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

चेतन पवार हे दररोज सकाळपासून रात्री उशिरापर्यंत घरोघरी प्रचार करत थेट मतदारांशी संवाद साधत आहेत. नागरिकांच्या समस्या ऐकून घेत, विकासाचा स्पष्ट अजेंडा मांडण्यावर त्यांनी भर दिला आहे. “फक्त आश्वासन नव्हे, तर कामाचा अनुभव” या मुद्द्यावर ते मतदारांमध्ये विश्वास निर्माण करताना दिसत आहेत.

या प्रचारात महिलांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरत आहे. अनेक ठिकाणी लाडक्या बहिणींनी औक्षण करून शुभेच्छा देत पाठिंबा व्यक्त केला असून, महिलावर्गातून मिळणारा हा प्रतिसाद पवार यांच्या प्रचाराला अधिक बळ देणारा ठरत आहे. ज्येष्ठ नागरिकांपासून तरुणांपर्यंत सर्व स्तरांत त्यांच्या नावाची चर्चा वाढू लागली आहे.

प्रभागातील एकमेव पुरुष उमेदवार म्हणून चेतन पवार यांना मिळणारा जनसमर्थनाचा कौल, तसेच पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा, आरोग्य आणि महिला सुरक्षेवर मांडलेली ठोस भूमिका यामुळे प्रभाग २५ मधील निवडणूक अधिकच चुरशीची बनली आहे. आगामी मतदानात हा जनसमर्थनाचा ओघ मतपेटीत किती उतरतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button