Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ मधील उबाठा गटाचे अधिकृत उमेदवार चेतन महादेव पवार यांनी प्रचारात भावनिक व विश्वासार्ह अशी वाटचाल सुरू ठेवली आहे. प्रचाराच्या धावपळीत त्यांनी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. अनुभव, मार्गदर्शन आणि आशीर्वाद हीच खरी ताकद असल्याचे सांगत चेतन पवार यांनी ज्येष्ठांशी संवाद साधला.

ज्येष्ठ नागरिकांनी “विकासाभिमुख, प्रामाणिक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारे नेतृत्व” अशी भावना व्यक्त करत चेतन पवार यांना विजयी भव: चा आशीर्वाद दिला. प्रभागातील पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडणाऱ्या चेतन पवार यांच्या उमेदवारीला दिवसेंदिवस जनसमर्थन वाढताना दिसत आहे.

उबाठा गटाच्या विचारधारेवर ठाम विश्वास ठेवत, जनतेच्या अपेक्षा आणि हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढणारे नेतृत्व म्हणून चेतन पवार यांची ओळख निर्माण झाली आहे. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि तरुणांचा उत्साह यामुळे प्रभाग २५ मध्ये लढत अधिकच रंगतदार होत असून, “हा विजय विकासाचा आणि जनसेवेचा असेल,” असा विश्वास समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version