प्रभाग २५ मध्ये ठाकरे गटाची ताकद एकवटली; भव्य आज खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार भास्कर जाधव यांची जाहीर सभा होणार, प्रचाराला येणार वेग
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाकरे गटाचा प्रचार जोरात सुरू असून, या पार्श्वभूमीवर येत्या काळात भव्य जाहीर सभा होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या जाहीर सभेत खासदार श्री. ओमराजे निंबाळकर आणि आमदार श्री. भास्कर जाधव हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प्रभागातील रखडलेली विकासकामे, नागरी सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि सुरक्षिततेसंदर्भातील प्रश्न या जाहीर सभेत ठळकपणे मांडले जाणार आहेत. ठाकरे गटाच्या माध्यमातून प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा ठोस आराखडा नागरिकांसमोर ठेवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
याच सभेत उमेदवार श्री. चेतन महादेव पवार आणि श्री. सागर विजय ओव्हहाळ हे प्रभागातील जनतेशी थेट संवाद साधणार असून, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विकासनिती मांडणार आहेत. पारदर्शक, लोकाभिमुख आणि जबाबदार कारभार देण्याचा निर्धार यावेळी जाहीर करण्यात येणार आहे.
या जाहीर सभेसाठी शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रभाग २५ मधील ही जाहीर सभा निवडणूक प्रचारात महत्त्वाची ठरणार असून, ठाकरे गटाच्या प्रचाराला नवी धार देणारी ठरणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.




















