प्रभाग २४ मध्ये सिद्धेश्वर बारणेंचा झंझावात! महिलांच्या आशीर्वादातून विजयाचा ठाम विश्वास
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक २४ मध्ये सिद्धेश्वर बाळासाहेब बारणे यांच्या प्रचारफेरीने संपूर्ण परिसरात राजकीय वातावरण तापवून टाकले आहे. गल्लीबोळांतून काढण्यात आलेल्या या प्रचारफेरीला नागरिकांचा, विशेषतः महिलांचा, उस्फूर्त आणि उत्साही प्रतिसाद मिळाल्याने बारणेंच्या विजयाचा आत्मविश्वास अधिक बळावला आहे. “महिलांचा आशीर्वाद हाच विजयाचा खरा विश्वास” हे चित्र या प्रचारफेरीतून ठळकपणे समोर आले.
प्रचारादरम्यान महिलांनी बारणेंना ओवाळून, शुभेच्छा देत आणि आशिर्वाद देत आपला पाठिंबा जाहीर केला. घराघरांतून मिळणारा प्रतिसाद पाहता, प्रभाग २४ मध्ये परिवर्तनाची लाट वेगाने आकार घेत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. महिलांच्या प्रश्नांवर, सुरक्षितता, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांबाबत बारणे यांनी ठोस भूमिका मांडत “कामातून विश्वास निर्माण केला आहे आणि तोच पुढे नेणार” असा निर्धार व्यक्त केला.
या प्रचारफेरीत तरुण, ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बारणे यांचे लोकांशी थेट संवाद, प्रश्नांची तात्काळ दखल आणि विकासाचा स्पष्ट अजेंडा यामुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता वाढल्याचे दिसून येत आहे. केवळ घोषणा नव्हे तर प्रत्यक्ष कामाचा हिशेब मागणारी जनता आता उघडपणे बारणेंच्या पाठीशी उभी राहिल्याचे चित्र आहे.
महिलांचा विश्वास आणि जनतेचा वाढता पाठिंबा पाहता, प्रभाग २४ मध्ये सिद्धेश्वर बाळासाहेब बारणे यांची प्रचारफेरी ही केवळ निवडणूक मोहीम न राहता, विजयाच्या दिशेने नेणारी निर्णायक वाटचाल ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.




















