ताज्या घडामोडीपिंपरी

प्रभाग २४ मध्ये प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद;  सिद्धेश्वर बाळासाहेब बारणे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ मध्ये प्रचाराला वेग आला असून अधिकृत उमेदवार बारणे सिद्धेश्वर बाळासाहेब यांच्या प्रचार दौऱ्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिव कॉलनी परिसरात घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधताना त्यांनी विकास, मूलभूत सुविधा आणि स्थानिक प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडली.

प्रचारादरम्यान नागरिकांनी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व सार्वजनिक सुविधा यांसारख्या प्रश्नांबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. त्यावर बारणे यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आराखडा असल्याचे सांगत, महापालिकेत सक्षम प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या कामकाजाची ओळख आणि सातत्यपूर्ण संपर्कामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण वर्गाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button