ताज्या घडामोडीपिंपरी

विकासाच्या विचारांना जनतेचा कौल; प्रभाग २२ मध्ये विनोद नढेंच्या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार विनोद नढे यांच्या प्रचारफेरीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, विकासाभिमुख विचारधारेवर जनतेने विश्वासाची मोहर उमटवली असल्याचे स्पष्ट चित्र सध्या दिसून येत आहे. भाजपच्या विकासाच्या ध्येयधोरणांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, विरोधकांच्या टीका आणि आरोपांना जनतेने साफ नकार दिला आहे.

विनोद नढे हे विकासकामांना प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या माध्यमातून प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य, स्वच्छता आदी मूलभूत सुविधांसाठी सातत्याने प्रयत्न झाले असून, “काम बोलते” या तत्त्वावरच त्यांनी जनतेशी नातं जोडले आहे. त्यामुळेच भाजपच्या विकासाच्या व्हिजनला सर्वसामान्यांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.

भाजपचे संघटन प्रभाग २२ मध्ये मजबूत असून कार्यकर्ते तळागाळापर्यंत सक्रिय आहेत. संघटनात्मक ताकदीमुळे नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला असून, येणाऱ्या निवडणुकीत भाजपचाच उमेदवार विजयी होईल, असा ठाम विश्वास मतदार व्यक्त करत आहेत.

दरम्यान, आज प्रभाग २२ मध्ये भाजपच्या वतीने प्रचारफेरी काढण्यात आली. पंचनाथ कॉलनी,( १, २ व ३ ), शिवरत्न कॉलनी, सहकार कॉलनी (१, २ व ३) तसेच या परिसरात प्रचार करताना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येक ठिकाणी महिलांनी औक्षण करून विनोद नढे यांचे स्वागत केले, तर “विजयी भव” अशा शुभेच्छा देत भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

एकूणच प्रभाग २२ मध्ये भाजपचा प्रचार विकास, विश्वास आणि संघटन या त्रिसूत्रीवर वेग घेत असून, विनोद नढे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button