ताज्या घडामोडीपिंपरी

प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपच्या उमेदवारांचा आज प्रचाराचा शंखनाद व पदयात्रा; आमदार शंकर जगताप यांच्या उपस्थितीत होणार शक्तीप्रदर्शन

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पार्टीकडून प्रचाराला वेग देण्यात येणार असून, रविवारी दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी भव्य प्रचार शुभारंभ व पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमामुळे प्रभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.

या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला आमदार चिंचवड विधानसभा व निवडणूक प्रमुख भाजप, पिंपरी-चिंचवड मनपा शंकर जगताप प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू होणार आहे. प्रभाग क्रमांक २२ मधून नीता पाडाळे, (महिला राखीव), कोमल सचिन काळे (महिला), विनोद जयवंत नढे (सर्वसाधारण) आणि एड. हर्षद सुरेश नढे (सर्वसाधारण) हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

ज्योतिबा गार्डन येथून या पदयात्रेला सुरुवात होणार असून, काळेवाडीतील प्रमुख चौक, कॉलनी आणि वसाहतींमधून प्रचार करत भाजप कार्यकर्ते व उमेदवार थेट नागरिकांपर्यंत पोहोचणार आहेत. ‘काळेवाडीच्या शाश्वत विकासासाठी भाजप’ हा संदेश घेऊन ही पदयात्रा काढण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, महिला आघाडी, युवक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपने संघटनबळ आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक रणशिंग फुंकले असून, आगामी निवडणुकीत भाजपची बाजू भक्कम असल्याचे संकेत या प्रचार शुभारंभातून स्पष्टपणे दिसून येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button