ताज्या घडामोडीपिंपरी

विनोद नढे यांच्या माध्यमातून प्रभाग २२ मध्ये ‘विकासाचा नवा अध्याय’ सुरू; कार्यकर्ते व मतदारांत उत्साह

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवार म्हणून नीता पाडाळे, कोमल काळे, विनोद नढे, ऍड. हर्षद नढे यांना संधी देण्यात आली आहे. या पॅनलच्या माध्यमातून परिसराच्या सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय सुरू होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विनोद नढे यांच्या नेतृत्वाखाली विकासाला गती देण्याचा निर्धार करण्यात आला असून, काळेवाडीच्या विकासाचा कायापालट करण्याचा निश्चय त्यांनी व्यक्त केला आहे. आज विजयनगर येथील नवरत्न मित्र मंडळ परिसर, मोरया कॉलनी, वैभव कॉलनी, सप्तश्रुंगी कॉलनी आदी भागांमध्ये प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जनतेच्या प्रश्नांसाठी निघालेल्या प्रचारयात्रेत विकासाचा आवाज ठळकपणे उमटताना दिसत असून, स्थानिक मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, प्रचार अधिक जोमाने सुरू आहे.

विनोद नढे यांच्या मागील कार्यकाळातील विकासकामांमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण असून, “विकासाचा नवा अध्याय सुरू” अशी चर्चा चौकाचौकात होत आहे. येत्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर भाजपच्या पॅनलला मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास स्थानिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button