ताज्या घडामोडीपिंपरी

प्रभाग २० मध्ये राजेश वाबळे पॅनलचा प्रचार ‘टॉप गिअरमध्ये ’; संत तुकाराम नगरात धनुष्यबाणाचा जोर

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक २० मध्ये शिवसेनेच्या (धनुष्यबाण) उमेदवार राजेश वाबळे यांच्या पॅनलने प्रचारात आघाडी घेतली असून संत तुकाराम नगर, पिंपरी परिसरात त्यांचा जनसंपर्क दौरा विशेष लक्षवेधी ठरत आहे. त्यांच्या पॅनल मध्ये विनोद वाघमारे वैशाली राजेश वाबळे, स्वीटी मलतपुरे यांनी घरोघरी भेटी, नागरिकांशी थेट संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर स्पष्ट भूमिका यामुळे वाबळे पॅनलला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

प्रचारादरम्यान पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी हे प्रमुख मुद्दे मांडण्यात येत असून “विकास, पारदर्शकता आणि जनहित” हा प्रचाराचा केंद्रबिंदू ठरला आहे. संत तुकाराम नगरातील नागरिकांनी वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या समस्या मार्गी लावण्यासाठी अनुभवी आणि सक्रिय नेतृत्वाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

राजेश वाबळे यांनी यावेळी सांगितले की, प्रभागातील मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांसाठी स्वतंत्र विकास आराखडा राबवण्यात येईल. त्यांच्या पॅनलमधील सर्व उमेदवार एकसंघपणे काम करत असल्याने प्रचाराला धार मिळत असून कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
एकूणच संत तुकाराम नगर, पिंपरी परिसरात धनुष्यबाणाच्या चिन्हाला मिळणारा वाढता पाठिंबा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभाग २० मध्ये राजेश वाबळे पॅनलची प्रचारात स्पष्ट आघाडी असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button